shaukat


मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही. मग...चला तर आजच आपला प्रवेश निश्चित करू !

Sunday 14 June 2015

MS-CIT


१० वी व १२ वी नंतर पुढे काय ?

१० वी व १२ वी नंतर पुढे काय ?


  हा प्रश्न खरंतर आज सर्वच  पालकांना व विद्यार्थ्यांना पडलेला असतो. जो तो आपआपल्या परीने उत्तरं शोधत असतो,बहुतेकदा शेजारी-पाजारी नातेवाइक फारफार तर एखादे वर्तमानपत्र ह्यांची मद्त सामान्य पालक व विद्यार्थी घेतात. माहीतीच्या महाजालामध्ये एकाच ठिकाणी करीअरच्या जवळ्जवळ ५०० संधीं आहे.

 करीअरची दिशा ठरवण्याचा योग्य काळ कुठला ?
 
करीयरची दिशा दहावीनंतरच ठरवली पाहिजे

आयुष्यातील दहावीचे वर्ष खूप महत्त्वाचे मानले जाते. चांगल्या करीयरची दिशा दहावीनंतरच ठरवावी. ज्या प्रमाणे कोणत्याही गोष्टीचे नियोजन केल्याने ती गोष्ट जरी कमी असली तरी पुरते हा आपल्या रोजच्या जीवनातील अनुभव असतोतसेच करीयरचे नियोजन केल्याने सामान्य बुद्धिमत्तेचे विद्यार्थीही उच्च स्थानी पोहचू शकतात.

कुठल्या शाखेला प्रवेश घ्यायचा हे कसे ठरवावे ?

पालकांनी  व विद्यार्थ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. दहावीनंतर विद्यार्थ्याला विविध अभ्यास शाखा उपलब्ध असतात. बर्‍याचदा गुण चांगले असतातमात्र कुठल्या शाखेला प्रवेश घ्यायचाहा प्रश्न विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही पडतो.

   1 सगळ्यात आधी विद्यार्थ्याचा स्वतःचा कल जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

   2 विद्यार्थ्याला कुठल्या विषयात करीयर करायचे आहेहे समजून घ्या.

   3 मग त्याविषयीचा विचार करा. त्या दिशेला नोकरीच्या संधी किती उपलब्ध आहेतत्याचे मन त्या विषयात रमेल काय?       याबाबत त्याला सविस्तर मार्गदर्शन केले पाहिजे.

   4 त्याचवेळी त्याची त्या विषयातली अभिरूचीयोग्यता व क्षमता पाहणेही महत्त्वाचे आहे. पालकवर्ग विद्यार्थ्यांमधील क्षमता न बघतात्याच्या इच्छेचा कुठलाही विचार न करता त्याला त्याच्या मनाविरूध्द शाखेकडे ढकलतात. मुळातच त्याच्या दृष्टीने चुकीचा विषय निवडला जातो. त्यात विशेष प्राविण्य मिळवता न आल्याने त्याच्यात वैफल्य निर्माण होते व तो करीयरच्या पहिल्या पायरीवर डगमगतो.

कोणते करियर योग्य ठरेल हे कसे तपासावे ?

    कोणते करियर योग्य ठरेल हे तपासण्यासाठी विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक मोजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध चाचण्या आहेत. अनेक मानसोपचार तज्ज्ञ या चाचण्या करतात. बुद्ध्यांक अचूक नसला तरी त्याचा मार्गदर्शनासाठी फार उपयोग होऊ शकतो. या प्रकारच्या चाचण्या घेऊन मार्गदर्शन करणार्‍या अनेक संस्था आहेत. साधारणपणे एप्रिल ते जून या महिन्याच्या कालावधीत या चाचण्या घेतल्या जातात.

 मुलांच्या मार्गदर्शनाची दिशा काय असावी ?

   भरपूर पैसा व प्रतिष्ठा मिळव हे तर दहावी झाल्यावर सर्वांचे स्वप्न असते. विविध प्रकारच्या कौशल्यात प्राविण्य मिळवलेल्यांची समाजाला गरज असते. या कौशल्याच्या जोरावर सा व प्रतिष्ठा मिळते. पालकांनी विद्यार्थ्यांना या बाबी सांगितल्या पाहिजेत. दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलांना व्यवहारज्ञान फारसे नसते. त्यांना अभ्यास एके अभ्यास या पलीकडे काय असते याची जाणीव नसते. त्यामुळे चांगल्या करीयरची निवड करताना ते गोंधळून जातात. या परिस्थितीत पालकांनी मुलांकडे लक्ष दिले पाहिजे. व्यवहाराच्या चार गोष्टी त्यांना शिकवल्या पाहिजे. मुलाच्या चांगल्या करीयरच्या दृष्टीने आपल्या शहरात अथवा शहराबाहेर कुठल्या महाविद्यालयात कोणकोणते अभ्यासक्रम शिकविले जातात याची माहिती काढावी.. 

Saturday 6 June 2015

****दहावीच्या निकालाची तारीख जाहीर...****

दहावीच्या निकालाची तारीख 8 जूनला दुपारी 1 वाजता....ऑनलाइन निकालाची प्रिंट आऊट काढून घेता येणार आहे....प्रिंट आऊट विनामुल्य काढून मिळेल...