shaukat


मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही. मग...चला तर आजच आपला प्रवेश निश्चित करू !

Saturday 7 March 2015

जागतिक महिला दिन

जन्म घेऊन कित्येक नाते जोडतेस तू
जन्म देऊन कित्येक नाते निर्मितेस तू
नको रडू..स्त्री जन्मा ही तुझी कहाणीम्हणत तू
शोध घे स्वत:चा ,एक नवीन कहाणी लिही तू
घर आणि करिअर,तारेवरची कसरत करतेय तू
२१ व्या शतकातली सुपरवुमन तू
रक्षण,आरक्षण हे आक्रोश सोड तू
कर्म करत रहा,’फळालापात्र होशील तू
भगिनी भाव जरुर पाळ तू
कणखर हो,स्वत:ची मदत स्वत: हो तू
विधात्याची नवनिर्माणाची कलाकृति तू
एक दिवस तरी स्वत:च्या अस्तित्वाचा साजरा कर तू
उठ चल,यशाच्या शिखरांची तुला साद..ऐक तू
स्त्रीम्हणून जन्मलीयेस,’व्यक्तीम्हणूनही जग तू
~~ जागतिक महिला दिन ~~





No comments:

Post a Comment